दुरंगी फुलांच्या शोधात
जगातील एकमेव दुरंगी फुलांच्या शोधात.....
अचानकच ठरलं जायचं.
नक्की ठिकाण माहिती नव्हतं.
गुगल केलं पण ....
शेवटी अंधारात तीर मारायचं ठरवलं.
एवढं माहिती होतं की गगनबावडा हायवे वरच आहे.
राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणा मधे हे झाड तोडल जाणार आहे.
बाचुळकर सरांचे शर्थीचे प्रयत्न चालू आहेत त्याला वाचवण्या साठी.........
कुडित्रे सोडून पुढे गेल्यावर रस्त्याची काम दिसायला लागली.
रस्त्यावर झाडांचं शिरकाण चालूच होतं.
झाडांची दफनभूमीच जणू😰
झाडांची ती निर्जीव शिल्पे पाहून डोळे पाणावले.
पण विकास हवा असेल तर त्याला काय पर्याय??
आकाश पूर्ण ढगांनी आच्छादून गेले होते.
एका बाजूला खूपच खराब रस्ता.
एवढ्या भक्कम गाडीची पण हाडं खिळखिळी व्हायच्या बेतात ......
शेण गाव यायचं काही चिन्ह नाही .किती लांब ते पण माहित नाही.
वाटेत एकेठिकाणी एक गणेशमंदिर लागले.पुढे सुंदर कमळांनी नटलेले गोल तळे.....
तीन पक्षी विहरत होते तळ्यात.
sangita: शेवटी झाड बघायला मिळलं की नाही
Manda: झोपली सीमा
Seema...tu चांगली ब्लॉग राईटर होऊ शकते.मागे पण लाल भोपळा पूर्ण असेच होते
[3/5, 21: ब्लॉग मध्ये पण असेच मध्येच सोडून द्यायचे....लोक विचार करत बसतील 😀
[3/5, 21:59] Manda: सस्पेन्स👍
[3/6, 10:07] Seema: तेच तर ,actually ते शेणवडे आहे. आम्ही शोधत होतो शेणगाव😅
[3/6, 10:09] Seema: अग,कुणाचा response येईना,म्हणून थांबले.😅
[3/6, 10:13] Seema: कळ्यामध्ये एकाला विचारलं ,तो म्हंटला अजून २० किमी.अजून....😲
आधीच 23km झालेले.
तरी जीव भांड्यात पडला,म्हणजे we were on right track. 👍
[3/6, 10:16] Seema: शेण व डे ची पाटी दिसल्यावर जीव डोळ्यात गोळा करून बघायला लागले.
ह्यांच चाललेलं ,अस कस दिसेल?
[3/6, 10:25] Seema: लाल फुलांची पुष्कळ झाडे दिसली,पण हे काय दिसायला तयार नाही.
आशा - निराशेच्या हिंदोळ्यावर
असतानाच मला एकदम पिवळ्या रंगाचा भास झाला.
[3/6, 10:26] Seema: आणि तेच होत आमचं झाड 🤣🤣
[3/6, 10:27] Seema: पण पिवळी फुलं कमीच होती ,एकाच फांदीला लागलेली.
[3/6, 11:15] Seema: आणखी बऱ्याच सुंदर सुंदर गोष्टी बघितल्या 😆😆
[3/6, 11:25] Seema: रस्ता खूप खराब आहे.
[3/6, 11:27] Seema: येताना मग आम्ही कळ्या वरून पडळ फा ट्या ने आलो.
दोन वडे जव ळ बाहेर.
[3/6, 11:29] Seema: हा रस्ता छान होता.पन्हाळा पाठीमागून दिसत होता. ❤️
बगळ्यांच झाड
सूर्य फुलं
नीलमोहोर
Comments
Post a Comment