Posts

Showing posts from October, 2024

रेवती नक्षत्राची पुराणकथा

***रेवती नक्षत्राची पुराणकथा***  रेवतीची कथा महाभारत आणि भागवत पुराण यांसारख्या अनेक पुराणग्रंथांमध्ये दिलेली आहे. विष्णु पुराणात रेवतीची कथा पुढीलप्रमाणे सांगितली आहे, राजा काकुद्मी (कधीकधी काकुडमीन किंवा रेवताचा मुलगा रैवता असेही म्हणतात) हा  कुशस्थलीचा राजा होता. रेवती ही  काकुद्मीची एकुलती एक मुलगी होती. आपल्या लाडक्या आणि हुशार मुलीशी लग्न करण्यासाठी पृथवीवरचा कोणीही मनुष्य लायक नाही, असे वाटून काकुद्मीने रेवतीला ब्रह्मलोकात - ब्रह्मदेवाच्या निवासस्थानी नेले. जेव्हा ते आले तेव्हा ब्रह्मा गंधर्वांचे संगीत ऐकत होते, म्हणून ते कार्यक्रम संपेपर्यंत धीराने थांबले. मग, काकुद्मीने नम्रपणे नमस्कार केला, विनंती केली आणि आपल्या उमेदवारांची निवड यादी सादर केली. ब्रह्मदेव मोठ्याने हसले आणि समजावून सांगितले की वेगवेगळ्या लोकांमधे काळ वेगवेगळ्या प्रकारे चालतो .आणि त्यांना  भेटण्यासाठी त्यांनी ब्रह्मलोकात घालवलेल्या अल्पावधीच्या काळातच पृथ्वीवर 27 चतुर्युग होऊन गेले होते आणि सर्व उमेदवार फार पूर्वीच मरण पावले होते.  ब्रह्मदेव पुढे म्हणाले की काकुद्मी आता एकटाच आहे कारण त्याचे मित्र, मंत्री, न